जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सरस्वती पूजन संपन्न.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या ‘जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूल’ मध्ये सरस्वती पूजन उत्साहात संपन्न झाले.
यावेळी श्री देवी सरस्वती मातेच्या फोटोचे पाटीचे पूजन करण्यात आले.
सरस्वती वंदना तथा प्रार्थना व स्तोत्रांनी कार्यक्रमाची सुरवात झाली आणि नंतर विद्यार्थी वर्गाची भाषणे झाली.
या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. निशिकांत पराडकर तसेच घुर्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पेडणेकर तसेच जय गणेश स्कूलचा सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी आणि श्रीमती सीताबाई घुर्ये प्रशालेचा कर्मचारी वृंद उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)