ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बाॅलिवुड अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या उपस्थितीत नवदुर्गाचा सत्कार समारंभ संपन्न..!

बाॅलिवुड अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या उपस्थितीत नवदुर्गाचा सत्कार समारंभ संपन्न..!

प्रकाशन: 03 Oct 2022 10:26 PM
वाचन संख्या 138

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित ‘हिरकणी’ लोकसंचलीत साधन केंद्र कणकवली व नगरपंचायत कणकवली दीनदयाळ अंत्योदय योजनाराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित ‘कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवली’ यांच्या वतीने आज ३ ऑक्टोबरला नवदुर्गांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Article image


यात साल २०२१ मध्ये नगरपंचायत अंतर्गत दिवाळी बाजार भरविण्यात आला होता त्या दिवाळी बाजारात तसेच ‘MSME प्रदर्शनात’ ज्या गटातील महिलांनी यशस्वीरित्या स्टॉल चालवले त्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या महिलांच्या सन्मान कार्यक्रमासाठी बाॅलिवुडच्या चरीत्र अभिनेत्री अक्षता कांबळी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Article image


या कार्यक्रमासाठी हिरकणी व्यवस्थापिका सीमा गावडे नगरपंचायतचे ए.पी.ओ. अमोल भोगले,क्षेत्रिय समन्वयक सिद्धी नलावडे व सहयोगिनी स्नेहा कदम यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमासाठी कनकसिंधू शहरस्तर अध्यक्षा सुचिता पालव, सचिव प्रणाली कांबळे, खजिनदार प्रिया सरूडकर, सहसचिव स्वाती राणे उपाध्यक्ष राजश्री पिळणकर, सदस्या दिव्या साळगावकर, शुभांगी उबाळे तसेच इशा कांबळी व सर्व ए.एल.एफ. चे पदाधिकारी तसेच बचतगट महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले व महिलांना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स