ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने खानोली गावामध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप..!

सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने खानोली गावामध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप..!

प्रकाशन: 04 Oct 2022 10:50 AM
वाचन संख्या 52

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या तर्फे खानोली गावातील जिवन शिक्षण शाळा खानोली नं – १ व खानोली नं -२ या दोन शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले .
शरदजी चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना सांगितला व त्याप्रमाणे नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावी असा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला .
यावेळी आंबेसवाडी शाळेसाठी विनामोबदला जागा देणारया कुटुंबातील श्री.बापु खाडे यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण, सौ. चव्हाण, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सौ.स्मिता दामले, खानोली सरपंच सौ.प्रणाली खानोलकर, उपसरपंच सुभाष खानोलकर, माजी सरपंच महेश खानोलकर, दिंव्याग आघाडीचे सुनील घाग, डाॅ. आजगांवकर, बुथप्रमुख बाळु खानोलकर, ओंकार चव्हाण, जतीन आवळेगांवकर, शिक्षिका सौ.सडवेलकर, सौ.ताडे, सौ.रेडकर, शिक्षक श्री.भोई व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स