बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात रांगोळी कलावंत समिर चांदरकर यांनी साकारली बॅरिस्टर नाथ पै यांची भव्य रांगोळी..!
विवेक परब/एडिटोरिअल असिस्टंट : बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दीचा सांगता सोहळा १ऑक्टोबर रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला येथे संपन्न झाला. दिनांक २५ सप्टेंबर २०२१ ते २५ सप्टेंबर २०२२ हा कालावधी बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले.
त्यानिमित्त बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज यांच्या सहकार्याने त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता काल बॅरिस्टर नाथ. पै यांच्या जन्म गावी वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
या कार्यक्रमाप्रसंगी व्हिक्टर डान्टस यांच्या माध्यमातून कार्यक्रम स्थळी बॅरिस्टर नाथ पै यांची भव्य रांगोळी साकारण्याची संधी रांगोळीकार तसेच वराडकर हायस्कुलचे कला शिक्षक समिर चांदरकर यांनी साकारली. रांगोळीत बॅरिस्टर नाथ पै यांच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटो वर रंगीत रांगोळी टाकण्याचा अभिनव प्रयत्न त्यांनी प्रयत्न केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)