कासार्डे दाबवाडी येथे ४ ऑक्टोबरला डबलबारी भजन सामना..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री इस्वटेश्वर, श्री विश्वकर्मा, श्री दुर्गामाता महिला मंडळ, कासार्डे दाबवाडी येथे नवरात्रौ उत्सवानिमित्त ०४ ऑक्टोबरला रात्रौ ठिक १० वाजता २०-२० आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ मुणगे आडवळवाडी बुवा श्री. समीर महाजन (गुरुवर्य बुवा श्री. राजेंद्र प्रभू, बुवा श्री. देवदत्त पुजारे)
विरुद्ध श्री मालवीर भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ बुवा श्री. शुभम पाळेकर (गुरुवर्य बुवा श्री. विजय परब, बुवा श्री. गुणाजी पाळेकर)
यांच्यात हा सामना होणार आहे. महाजन यांना
पखवाज श्री तुषार परब, तबला श्री सुनील बोरकर तर पाळेकर यांना
पखवाज- श्री सर्वेश पाळेकर, तबला- श्री दिलीप पाटकर हे साथ करणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)