चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी नऊ नारळांवर साकारली देवीची चित्रे..!
मालवण | सुयोग पंडित : सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवा साठी विविध संकल्पनांची रेलचेल सुरु आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या गवाणे गावचे चित्रकार श्री.अक्षय मेस्त्री यांनी यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
अक्षय मेस्त्री यांनी नऊ नारळांवर नऊ विविध देवींची चित्रे चितारुन श्रीफळ म्हणजे नारळामार्फत देवी शक्तीचा एक अनोखा जागर केला आहे.
याविषयी अक्षय यांनी भारतीय सणांमध्ये नारळाला महत्वाचे स्थान आहे हे अधोरेखीत करताना महिला ओटी भरतात त्या ओटीतल्या नारळावर वेगळी कलाकृती साकारून नवरात्रोत्सवाचा पर्यावरण व सामाजिक मेळ घातला आहे.
नऊ देवीची नऊ चित्रे ज्या नारळांवर आहेत त्या
नारळांची उंची व लांबी ३ इंच x ५ इंचच्या आसपास आहे. चित्र काढायला त्यांना १५ ते २० मिनिटे लागल्याचे समजते.
यापूर्वी झाडाच्या खोडावर आणि साडीवर देखील त्यांनी देवीची सर्वात छोटे चित्र काढले होती.
ही सर्व नारळावरची चित्रे भविष्यात प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
सध्या गावचे सर्व ग्रामस्थ आणि कलाप्रेमी या कलाकृती पहायला येत आहेत.
चित्रकलेमधून वेगवेगळे प्रयोग अक्षय मेस्त्री नेहमी करत असतात. त्यांच्या सर्व प्रयत्नांना सामाजिक पार्श्वभूमी व जागृतीची किनार असते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)