ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगांव येथील वैद्यकीय व्यावसायिक मनोहरतीर्थ महेंद्रकर यांचे निधन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगांव येथील वैद्यकीय व्यावसायिक मनोहरतीर्थ महेंद्रकर यांचे निधन..!

प्रकाशन: 01 Oct 2022 11:11 AM
वाचन संख्या 98

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मनोहरतीर्थ नारायणराव महेंद्रकर यांचे २९ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सानिध्यात नागपूर मोजारी येथील आश्रमात त्यांचे शिक्षण झाले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९६६ मध्ये रत्नागिरी येथे जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रूजू झाले. देवगड तालुक्याचे पहिले पंचायत समिती सभापती आर. आर. लोके यांनी त्यांना देवगड तालुक्यात आणले. डॉ. महेंद्रकर यांनी देवगड, बांदा, नाटळ, गुहागर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. शिरगाव येथे मातृमंदिर या मॅटर्निटी होमची स्थापना करून तालुक्यातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात वैद्यकीय सेवा दिली.
त्यांच्या पश्चात पत्नी, पाच विवाहित मुली, मुलगा, सून, नातवंडे व जावई असा परिवार आहे. वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुप्रसाद महेंद्रकर यांचे ते वडील तर शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी कोर्टुरवार यांचे ते सासरे होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स