महामार्गावरील अवघड वळणावर अपघात..!
कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो हळवल फाट्यावर असलेल्या अवघड वळणावर जाऊन पलटला. हा टेम्पो तेथील टपऱ्यांवर जाऊन कोसळला पहाटे चार वाजता ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला.
टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र येथील अवघड वळणावर ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. आतापर्यंत सहा ते सात वेळा याच ठिकाणी अपघात झाले असून तिघांनी आपले प्राण गमावले आहेत. हे वळण वाहनचालकांसाठी धोकादायक असल्याचे लक्षात येते. आजच्या अपघातात जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)