ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बारावीची ऑनलाईन अर्जप्रक्रिया..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बारावीची ऑनलाईन अर्जप्रक्रिया..!

प्रकाशन: 01 Oct 2022 10:55 AM
वाचन संख्या 33

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रियेला आज शनिवार १ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. १ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. विद्यार्थ्यांनी ‘सरल डेटाबेस’ वरून कनिष्ठ महाविद्यालयीन प्रमुखांमार्फत अर्ज करावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाईन पद्धतीने परीक्षेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठीच्या तारखा गुरुवारी जाहीर करण्यात आल्या. मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यासाठी सरल डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे. अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स