ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरेत पत्रकारांच्या पाल्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरेत पत्रकारांच्या पाल्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन.

प्रकाशन: 30 Sep 2022 09:56 PM
वाचन संख्या 107

उद्या होणार्या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांचाही होणार सन्मान.

मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे व उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी दिली माहिती.

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार पाल्यांसह सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा मसुरे-मर्डे येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल सभागृहात उद्या शनिवारी १ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे व उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी या सोहळ्याची माहिती दिली आहे.

या सोहळ्याला मालवण तहसीलदार अजय पाटणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सत्कार सोहळ्यास भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, मर्डे सरपंच संदीप हडकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष बंटी केनवडेकर, कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांच्या हस्ते मालवण तालुक्यातील पत्रकार पाल्यांचा गौरव केला जाणार आहे. सर्व पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स