ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
तळेरे हायस्कूल मध्ये मंत्री मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर..!

तळेरे हायस्कूल मध्ये मंत्री मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर..!

प्रकाशन: 30 Sep 2022 01:33 PM
वाचन संख्या 174

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील
‘वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा’ ‘शालेय मंत्रिमंडळ निवडणूक’ निकाल नुकताच जाहीर करण्यात आला .
यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी विराज संजय नांदलस्कर तर विद्यार्थीनीं प्रतिनिधी म्हणून मिताली गोपाळ चव्हाण हे बहुमताने विजयी ठरले .

यावेळी विविध मंत्रीपदासाठीही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये सांस्कृतिक मंत्री स्नेहल संतोष तळेकर , महसूल मंत्री सानिका अनिल बांदिवडेकर , क्रीडा मंत्री हेमांगी महेश भोगटे , फलोद्यान मंत्री मयुरी संतोष तळेकर , शिस्त मंत्री आर्या गणेश घाडी , स्वच्छता मंत्री अथर्व भूषण तळेकर , सजावट मंत्री वेद राजाराम शेळके हे उमेदवार विजयी ठरले.
निवडणूक मुख्य अधिकारी प्रा.ए.बी. कानकेकर, जेष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एन. पी.गावठे, प्रा. ए.पी.कोकरे, एस.जाधव , ए.बी.तांबे या अधिकारी वर्गाच्या सहाय्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली .
तर मतमोजणी शिक्षिका डी.सी. तळेकर , पी.एम. पाटील , सहायक शिक्षक एन.बी. तडवी , पी.एन. काणेकर , व्ही.डी. टाकळे , एस.यु.सुर्वे या अधिकारी वर्गाच्या सहाय्याने करण्यात आली .
यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे संस्था व विद्यालयामार्फत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्राचार्य अविनाश मांजरेकर , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वरीष्ठ लिपीक आर. जी. तांबे , कल्पेश तळेकर , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर , विद्यार्थी आदी उपस्थित होते.

सर्व विजयी उमेदवारांचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , चेअरमन अरविंद महाडीक , दिलीप तळेकर , प्रविण वरुणकर , शरद वायंगणकर , संतोष जठार ,संतोष तळेकर , निलेश सोरप , उमेश कदम , विद्यार्थी , पालक यांनी अभिनंदन केले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स