बांदा येथे अपरहरणाचा प्रयत्न…?
बांदा | राकेश परब: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा शहरातील निमजगा प्राथमिक शाळेच्या तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वाफोली रस्त्यावर दुचाकीने आलेल्या दोन इसमानी चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने प्रसंगवधान दाखवत मुलाने संशयितच्या हाताचा चावा घेऊन आपली सोडवणूक केली. सकाळी साडेदहा वाजता भर वस्तीत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सरपंच अक्रम खान व ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेत संशयितना शोधण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. या विद्यार्थ्याने आपल्यासोबत २ दिवसांत दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, जावेद खतीब, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, साहिल कल्याणकर, खेमराज शाळेचे पर्यवेक्षक नंदू नाईक, तोरसे माजी सरपंच बबन डिसोझा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका शहरातून अशाच घटनेची बातमी पसरली होती परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नव्हते. व ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)