दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक ; महामार्ग वाहतूक पोलिस तत्परता आणि मदत.
कणकवली | प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराकडून बोर्डवे गावाकडे जात असलेल्या दुचाकीची एका
अज्ञात वाहनाला जोरदार धडक बसल्याने बोर्डवे येथील अमोल बागवे (२७) हा तरुण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर अमोल बागवे याला तातडीने येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास महामार्गावर वागदे डंगळवाडी दरम्यान घडला. अपघातानंतर तातडीने महामार्ग वाहतूक मदत केंद्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
१०८ रुग्णवाहिकेने जखमी अमोल बागवे यांना तातडीने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार सुधीर घारकर, संकेत चिंदरकर, दत्ता कांबळे, एडवर्ड भुतेलो, सचिन करवंजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला मदत कार्यासाठी सहकार्य करत वाहतूक सुरळीत केली असे सूत्रांकडून समजते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)