ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पळसंब गांवचे आदर्श सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांची सरपंच सेवा संघाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी निवड…!

पळसंब गांवचे आदर्श सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांची सरपंच सेवा संघाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी निवड…!

प्रकाशन: 29 Sep 2022 10:58 PM
वाचन संख्या 295

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे आदर्श सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांची सरपंच सेवा संघाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
श्री.चंद्रकांत गोलतकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातले एक क्रियाशील सरपंच म्हणून ओळखले जातात.

Article image

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना आज सायंकाळी या संदर्भातील अधिकृत पत्र पाठवून सरपंच सेवा संघाने त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना तालुकाध्यक्ष पदी निवड करत असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्यात सरपंच सेवा संघाची स्थापना करण्यात आली असून नुकतीच अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हांमधील जिल्हा अध्यक्षांच्या व तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्वरावरील पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे कार्य बघुन जिल्ह्यातील खेड्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने त्यांनी कामकाज करावे अशी अपेक्षा सरपंच सेवा संघाच्या पत्राद्वारे व्यक्त केली गेली आहे. आवश्यकता असेल तेंव्हा जिल्ह्यातील व तालुक्यातील गावांच्या विकासामध्ये सरपंचांना मार्गदर्शन करण्याचीही त्यांना आग्रहाची जबाबदारी देण्यात आली आहे.
गावांच्या विकासासाठी तळमळ बघुन नोंदणीकृत झालेल्या सरपंच सेवा संघाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी अधिकृत निवड करताना त्यांनी तालुक्यातील व जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांना संघटीत करून जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण करण्यासाठी आपण सरपंचांना मार्गदर्शन करावे ही निवड दोन वर्षाकरीता असेल तर पुननिवृत्ती ही कामगिरीनुसार ठरवली जाईल असेही पत्राद्वारे स्पष्ट केले गेले आहे.

सरपंच सेवा संघ संघटनेमार्फत तालुक्यातील व जिल्ह्यातील सरपंचांना एकजूट करण्याची जबाबदारी श्री.चंद्रकांत गोलतकर यांच्यावर सोपविण्यात आली असून ती जबाबदारी ते कौशल्यपूर्णतेने सांभाळतील असा विश्वास पत्राद्वारे व्यक्त केला गेला आहे. पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना पुढील वाटचालीसाठी सरपंच सेवा संघाने शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रोहीत संजय पवार, राज्य संघटक अमोल शेवाळे व संस्थापक व सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांनी पत्राद्वारे ही घोषणा करताना पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स