पळसंब येथे 'राष्ट्रीय पोषण माह' सप्टेंबर २०२२ कौतुक सोहळा संपन्न..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब ग्रामपंचायत गावात आज राष्ट्रीय ‘पोषण माह सप्टेंबर २०२२’ कौतुक सोहळा संपन्न झाला .
या कार्यक्रमाला सरपंच चंदकांत गोलतकर यांनी मुलांचे स्वागत केले तसेच ग्रामपंचायतच्या वतीने रंगपेटी, चित्रकला पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका प्रिया चिंदरकर यांनी केले.
या निमित्त स्वस्थ बालक स्पर्धा घेण्यात आली. या मध्ये ६ महिने ते ३ वर्षे वयोगटामध्ये कु. तन्मय तुषार परब प्रथम, पळसंब टेंबवाडी येथील पार्थ अमित साईल प्रथम, शेखर सहदेव राउत कु .जिया सचिन वणे प्रथम, कु. तनिल प्रमित साईल तर पळसंब गावठणवाडी येथील
३ ते ५ वर्षे वयोगटातील कु. सार्थकी गुरुदास वाळवे प्रथम, जिहान मुरारी परब द्वितीय क्रमांकाने कौतुकले गेले.
या कार्यक्रमाला उपसरपंच सुहास सावंत ग्रामसेवक अमित कांबळी ,अंगणवाडी सेविका निखिता पुजारे ,सुचिता सावंत मदतनीस अंजली गोलतकर , सुनित्रा परब माता पालक स्मिता परब , जान्हवी साईल अमृता वने मयुरी परब , तनीषा परब रिया चव्हाण, रिया राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाविषयी बोलताना पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी सांगितले की शिशु आणि बालवयातील आहार व आरोग्य यावरच आगामी काळातील युवापिढीच्या प्रगतीची सक्षमता ठरत असते. सात्विक आहार ही आधुनीक काळाची गरज असल्याचेही प्रतिपादन सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)