ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अ बिग ब्लो..! जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर…!

अ बिग ब्लो..! जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर…!

प्रकाशन: 29 Sep 2022 03:59 PM
वाचन संख्या 187

विश्वचषकाच्या मोहीमेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का..!

सुयोग पंडित | क्रिडा विश्व : ऑस्ट्रेलिया मध्ये आयोजीत आगामी ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे असे सूत्रांकडून समजते.
बि.सि.सि.आय. मार्फत अधिकृत वृत्त दिले नसले तरी पि.टी.आय.वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Article image


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी सराव सत्रात जसप्रीतच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याने या सामन्यातून माघार घेतली. पण आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार तो विश्वचषकासाठी अनुपलब्ध असेल असे सूत्रांकडून समजते आहे.

Article image

मोहम्मद शमी व दीपक चहर यांची ट्वेंटी-२० संघात राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. आता या दोघांपैकी एकाची मुख्य संघात निवड होऊ शकते. शमी अजूनही कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याची फिटनेस टेस्ट बीसीसीआय घेणार आहे. दीपक चहरने बऱ्याच दिवसांनी मिळालेल्या संधीचं सोनं करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२०त २ विकेट्स घेतल्या. बुमराहची माघार हा भारताला खूप मोठा धक्का आहे.
आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारताला डेथ ओव्हरमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे बुमराहच्या पुनरागमनामुळे भारताला बळ मिळाले होते.

भुवनेश्वर कुमारची चिंताजनक अशी बिघडलेली गोलंदाजीतील लय आणि आता बुमराहची दुखापत अशा दोन समस्या सोबत घेऊन भारताची टी २० विश्वचषक २०२२ मोहीम’ सुरु होणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स