ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
डॉ. गोविंद काजरेकर यांची बांदा महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

डॉ. गोविंद काजरेकर यांची बांदा महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती..!

प्रकाशन: 29 Sep 2022 02:51 PM
वाचन संख्या 73

बांदा | राकेश परब :
येथील गोगटे-वाळके महाविद्यालय, बांदाच्या प्राचार्यपदी डॉ.गोविंद काजरेकर यांची नियमित प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. काजरेकर हे याच महाविद्यालयात गेली २७ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करत असून ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी विषयात पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ही आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर लेखक संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे . डॉ. काजरेकर हे महाराष्ट्रातील एक नामवंत कवी व समीक्षक असून त्यांच्या साहित्य निर्मितीला महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ठ ग्रंथनिर्मिती पुरस्कारासह एकूण चार राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आहेत. डॉ. काजरेकर मागील तीन वर्षे गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते. आता त्यांची विद्यापीठ व शासन नियुक्त समितीमार्फत निवड होऊन त्यांना प्राचार्यपदी नेमण्यात आले. त्याविषयी त्यांना विद्यापीठाच्या मान्यतेनुसार संस्थचे अध्यक्ष मा. श्री. डी. बी. वारंग यांनी अधिकृत पत्र दिले. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ बांदा या संस्थचे अध्यक्ष श्री. डी. बी.वारंग, उपाध्यक्ष श्री. प्रमोद कामत, सचिव श्री.एस.आर.सावंत, खजिनदार श्री. टी.एन.शेटकर, सहसचिव श्री. डी. एस. पणशीकर, सदस्य श्री. सुभाष मोर्ये, श्री. मंदार कल्याणकर, श्री. प्रेमानंद नाडकर्णी , श्री.शीतल राऊळ तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स