ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
"सेवा पंधरवडा" निमित्त वेंगुर्ले शहरातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांचे रस्त्यावरील खड्डे बुजवून सेवाकार्य..!

"सेवा पंधरवडा" निमित्त वेंगुर्ले शहरातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांचे रस्त्यावरील खड्डे बुजवून सेवाकार्य..!

प्रकाशन: 29 Sep 2022 12:18 PM
वाचन संख्या 34

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा आयोजित केला जात असताना, वेंगुर्ले शहरातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी हाॅस्पीटल नाका ते भटवाडी या नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीट च्या सहाय्याने बुजवुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.वेंगुर्ले तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा मध्ये आरोग्य शिबीर, रक्त दान शिबीर, नेत्रचिकीस्ता व मोतीबिंदू तपासणी शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप, मुलांना खाऊ वाटप, केंद्र सरकार च्या योजनांचे लाभ इत्यादी सेवाकार्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. परंतु वेंगुर्ले शहरातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी अनोखे असे सेवाकार्य करून एक नवीन पायंडा पडला . यावेळी भटवाडी येथील युवा नेतृत्व प्रीतम उर्फ पींटू सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदित्य खानोलकर, बाळा गावडे,
चिमलो आरावुज, दत्ताराम तावडे,
भुषण सावंत, योगेश गोवेकर,
सुभाष सोनुरलेकर, कपिल सावंत, प्रथमेष सावंत, शुभम सावंत, नवनाथ सावंत, आनंद कळेकर, सचिन मांजरेकर इत्यादी युवकांनी या सेवाकार्यात सहभागी होऊन नागरिकांना रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करुन दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स