ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिलिंडरने घेतला पेट…!

सिलिंडरने घेतला पेट…!

प्रकाशन: 29 Sep 2022 12:13 PM
वाचन संख्या 117

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील जळकेवाडीत घरगुती सिलेंडरचा नॉब उघडत असताना सिलेंडरने तेथील आगीच्या संपर्कात आल्याने अचानक पेट घेतला. कणकवली जळकेवाडी येथील बबन चव्हाण यांच्या घरात गुरुवारी सकाळी ९:०० वा. सुमारास ही घटना घडली.

Article image


बबन चव्हाण यांचा मुलगा राजू चव्हाण यांनी पेटता सिलेंडर घराबाहेर ढकलला व मोठा अनर्थ टळला.
या घटनेत घराच्या वासे ज्वाळांनी वेढले गेले . सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी नाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर यांच्यासह स्थानिकांनी प्रसंग सावधान राखत सिलेंडरची आग विझवली.
सिलिंडर घराबाहेर ढकलल्याने पेटत्या सिलिंडर मुळे तीन वाशांनी पेट घेतला. या घरापर्यंत जाण्यासाठी अरूंद रस्ता असल्यामुळे घटनास्थळापर्यंत अग्निशमन बंब पोहोचू शकला नाही. परंतु नंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह सर्वांनी सतर्कता बाळगून छोट्या बंबाला पाचरण करण्यात आले परंतु नागरिकांनी त्याआधीच आग आटोक्यात आणली.

सदर घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक बंडू गांगण, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायत कर्मचारी रोहन डीचोलकर, विनोद जाधव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स