ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देव देवतांचे विडंबन खपवून घेतले जाणार नाही : आमदार नितेश राणे.

देव देवतांचे विडंबन खपवून घेतले जाणार नाही : आमदार नितेश राणे.

प्रकाशन: 29 Sep 2022 10:44 AM
वाचन संख्या 39

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्यातल्या व्यापारी,सेवेकरी यांनी एकत्र येत जी एकजूट दाखवली आहे ती उल्लेखनीयआहे. देवतांचे विडंबन करण्याचे प्रकार वारंवार केले जातात ते आता खपवून घेतले जाणार नाहीत.जेव्हा अशा कंपन्यांना कडक शासन होईल.तेव्हा परत कोणी असा प्रकार करण्याची हिंमत करणार नाही. बांदावासियांनी ही त्याग आंदोलनाद्वारे जनजारणाचा आदर्श दिला आहे. आता त्या कंपनी समजेल अशा भाषेत धडा शिकवायची व जाहीर माफी मागायला लावायची जबाबदारी माझी आहे असे प्रतिपादन कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी बांदा येथे केले.
त्याग आंदोलनात सहभागी झालेली देवस्थाने, व्यापारी ,भाविक व सेवेकरी यांची बांदा येथे भेट घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधताना ते बोलत होते.

बांदा संत सोहिरा मठात आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर ,बांदा सरपंच अक्रम खान ,व्यापारी अजय महाजन ,ग्रा.पं.सदस्य जावेद खतिब उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात त्याग आंदोलनाचे प्रणेते आशुतोष भांगले यांनी गेले वर्षभऱ सुरु असलेल्या या आंदोलनाची माहीती दिली.
या आंदोलनाची दखल घेत स्वत: बांद्याला येऊऩ आंदोलकांना भेटल्याबद्दल आ.नितेश राणे यांचे आणि आपण जाहिररित्या केलेले आवाहन आमदार नितेश राणे यांच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल सरपंच अक्रम खान यांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी जयप्रकाश सावंत,राजेश पावसकर, ज्ञानेश्वर येडवे,राकेश केसरकर ,प्रसाद आंबिये, तसेच भजनकर्मी गिरिश महाजन ,व्यापारी अजय महाजन ,महिला सेवेकरी गीता गर्दे आदींना आ.राणेंच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत ,माजी जि.प.सदस्य श्वेता कोरगांवकर,माजी सरपंच मंदार कल्याणकर,ग्रा.पं.सदस्य राजेश विर्नोडकर,उमांगी मयेकर या कार्यक्रमाला बांद्यातील व्यापारी,भाविक,भजनकर्मी सेवेकरी मोठ्या संख्येेने आवर्जून उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स