ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कळसुली देंदोनवाडी प्रकल्पातील अपूर्ण कामे लवकर पूर्ण करा : सुशांत दळवी

कळसुली देंदोनवाडी प्रकल्पातील अपूर्ण कामे लवकर पूर्ण करा : सुशांत दळवी

प्रकाशन: 03 Sep 2021 07:13 PM
वाचन संख्या 67

मा. कार्यकारी अभियंता लघु पाठबंधारे विभाग यांना निवेदन

उमेश परब / कणकवली : कळसुली देंदोनवाडी प्रकल्पातील नियोजित कामे बरेच दिवस अपूर्ण आहेत. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी सुशांत दळवी व कळसुली विभागातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. याबाबत कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या मागणीवर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली असून ही कामे येत्या काळात मार्गी लावू असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे. याप्रसंगी श्री चंदू परब. श्री अरुण राऊळ .श्री नंदकिशोर परब व शाखा उपअभियंता श्री हिरेगौडर उपस्थित होते.
कळसुली देंदोनवाडी प्रकल्पातील
सांद्रेवाडी ,भोगनाथवाडी गावकरवाडी ,परबवाडी , सुद्रिकवाडी गवसेवाडी कालव्याची अपुर्ण असलेली कामे, तसेच अतिशय खराब झालेल्या मुख्य रस्त्याची तात्पुरती डागडुजी व कायमस्वरूपी डांबरीकरण करणे, त्या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणे, आदी समस्या दिनांक 16 ऑगस्ट रोजी पुनर्वसन येथे खासदार विनायक राऊत साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत मांडण्यात आल्या होत्या त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत कार्यकारी अभियंता ल पा विभाग ओरोस यांना पत्र देऊन समस्या निराकरणासाठी सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स