ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री बाळकृष्ण मांजरेकर यांचे निधन…!

सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री बाळकृष्ण मांजरेकर यांचे निधन…!

प्रकाशन: 28 Sep 2022 06:53 PM
वाचन संख्या 105

मसुरे | प्रतिनिधी :
देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री रामेश्वर हायस्कुलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री बाळकृष्ण महादेव मांजरेकर ( ७४ वर्ष) यांचे बागमळा येथील राहत्या घरी अल्प आजाराने निधन झाले. इंग्रजी विषय सोप्या भाषेत शिकविण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. अत्यंत कडक शिस्तीचे व विध्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अनेक विध्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते कार्यरत असायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, नातू असा परिवार आहे. मुणगे ज्यू कॉलेजचे शिक्षक गुरुप्रसाद मांजरेकर यांचे वडील तर सेवानिवृत्त स्टेट बँक लिपिक भाई मांजरेकर व सेवानिवृत्त शिक्षक काशिनाथ मांजरेकर यांचे जेष्ठ बंधू तर कणकवली येथील उद्योजक निलेश गोवेकर यांचे काका होत.
फोटो: बाळकृष्ण मांजरेकर

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स