ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शाळांमधील राजकीय अस्तित्व दिशा की दशा ; मनविसेचे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल यांचा सवाल.

शाळांमधील राजकीय अस्तित्व दिशा की दशा ; मनविसेचे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल यांचा सवाल.

प्रकाशन: 28 Sep 2022 02:41 PM
वाचन संख्या 226

आता विद्यार्थी वर्गाला सुद्धा पक्ष प्रचाराच्या वेठीस धरणार का असा विचारला प्रश्न.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे’ (मनविसे) जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक कुबल यांनी जिल्ह्यातील हिर्लोक हायस्कूलमधील भाजपाच्या पोस्टरबद्दल जाब विचारला आहे.
शाळेतील भिंतींना आतून सभोवताली पक्षाच्या बॅनर्सने सजवून शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींना दिशा मिळणार की आत्तापासून दशा अनुभवायला लागणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला .

महाविद्यालयीन स्तरावर मनविसे चे युनिट स्थापनेच्या वेळी काहींनी ‘मनसे राजकारण करते आहे’ असा आरोप केलेला ते आता कुठे आहेत असेही प्रतिक कुबल यांनी विचारले आहे.
राजकीय फायद्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या बालमनाचा व बालपणाचा वापर कशासाठी असे विचारताना शाळेमध्ये पक्षाचे झेंडे हे शैक्षणिक क्षेत्रातील मुक्तता व तटस्थतेची पायमल्ली असल्याची प्रखर टीका प्रतिक कुबल यांनी केली आहे.

जरी कोणत्याही राजकीय पुढारी , पदाधिकारी तथा पक्षाने एखाद्या शाळेला व संस्थेला आर्थिक मदत मिळवून द्यायचे प्रयत्न केले असले तरी त्याचा अर्थ त्या शैक्षणिक संस्थेवर तथा शाळेवर त्या त्या पक्षांचे झेंडे लागले असा घेतला जाईल व ते लोकशाहीसाठी घातक असेल असेही प्रतिक कुबल यांनी प्रतिपादन केले आहे.

मनविसे महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गासाठी काम करताना त्यात सर्वपक्षीय युवक संघटीत होऊन केवळ शिक्षण सामाजिक प्रश्नांना तडीला न्यायचा प्रयत्न करत आहे असे मनविसे उप जिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल यांनी विशेष नमूद केले आहे.
या प्रकरणामध्ये आपला वैयक्तिक कोणत्याच पक्षाच्या प्रचाराच्या ध्येयधोरणांबद्दल आक्षेप नाही तर केवळ शालेय विद्यार्थी दिशेला कोणतीच वेगळीच राजकीय दशा भोगावी लागू नये ही आग्रहाची मागणी असल्याचे प्रतिक कुबल यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स