ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून वरवडे येथील गणपती सान्यासाठी निधी मंजूर.

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून वरवडे येथील गणपती सान्यासाठी निधी मंजूर.

प्रकाशन: 28 Sep 2022 01:57 PM
वाचन संख्या 32

जानवली नदीतीरावर गणपती साना बांधण्यासाठी १५ लाखांचा निधी मंजूर..!

माजी पं.स.उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या पाठपुराव्याला यश.!

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून वरवडे चव्हाण दुकानामागे जानवली नदीतीरावर गणपती साना बांधण्यासाठी १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
यामुळे वर्षानुवर्षांची कलमठ वरवडे गावातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या ठिकाणी गणपती साना मंजूर व्हावा यासाठी माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी आमदार नितेश राणेंकडे पाठपुरावा केला होता.

कलमठ सुतार वाडी, लांजेवाडी व वरवडे गावातील सुतारवाडीतील ग्रामस्थ आपल्या घरगुती गणपतीचे या ठिकाणी विसर्जन करतात. परंतु गणपती विसर्जन वेळी ग्रामस्थांची गणपती सांना नसल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे येथे गणपती साना बांधून मिळावा ही स्थानिकांची अनेक वर्षे मागणी होती. माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी आमदार नितेशजी राणे यांच्या कडे गणपती सान्यासाठी निधी ची मागणी करताच, आमदार नितेश राणे यांनी लेखाशीर्ष २५२५ व १२३८ अंतर्गत मंजूर विकास कामा मध्ये १५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्या मुळे वर्षानुवर्षे मागणी असलेला गणपती साना उपलब्ध होणार असून गैरसोय दूर केल्याबद्दल ग्रामस्थांचे समाधान झाले असून स्थानिक नागरिकांनी आमदार नितेश राणे यांची प्रशंसा केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स