वैभववाडी युवासेना कार्यकारिणीची बैठक शिवसेना कार्यालयात संपन्न.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाड तालुका युवासेना कार्यकारणीची बैठक युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवसेना तालुका कार्यालय वैभववाडी येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, जिल्हाकार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी संघटना वाढी संदर्भात मार्गदर्शन केले.
युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने युवासेना उपतालुका प्रमुख -प्रवीण काडगे, उपविभाग संघटक (भुईबावडा प स) – शुभम चव्हाण , सुमित पवार – शाखाप्रमुख तिरवडे तर्फे खारेपाठण, अभिषेक गवाणकर -शाखा प्रमुख मांगवली, सुरज झिमाळ – शाखाप्रमुख लोरे, रोमिल मोरे- शाखा प्रमुख भुईबावडा, गणेश पाटील- शाखा प्रमुख कुर्ली, सागर पाटेकर- उपशाखाप्रमुख मौदे, विक्रांत घुगरे- उपशाखाप्रमुख तिरवडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत जिल्हा समन्वयक -गीतेश कडू, जिल्हा चिटणीस -स्वप्नील धुरी, तालुका प्रमुख- मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य -संदीप सरवनकर, जिल्हा परिषद सदस्या- दिव्या पाचकुडे, युवासेना तालुका प्रमुख -अतुल सरवटे, विभाग प्रमुख -आकाश गुरव, गणेश पवार, रोहित पावसकर, वाहतूक सेना तालुका प्रमुख -बबन धुरी, जितेंद्र तळेकर, रोहन रावराणे, राजेश पवार, निखिल मोरे, रोहित रावराणे आणि अनेक इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)