मनसे तर्फे मालवणात भव्य खुल्या गरबाचे आयोजन..!
म.न.वि.से.च्या युवा कार्यकर्त्यांचाही सक्रीय सहभाग.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात ५ ऑक्टोबरला दसऱ्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून भव्य खुली गरबा आयोजित करण्यात आली आहे.
त्या साठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी मालवण बंदर जेटी वर गरबा भरविण्यासाठी जागेसाठी परवानगी साठी अर्ज केला होता. बंदर विभागाकडून देखील या उपक्रमाला परवानगी दिली गेली आहे.
ही भव्य खुली गरबा सर्व मालवण वासीयांना लहान मुले ,तरुण-तरुणींना तसेच वृद्धांना एक खुल्या गरबा खेळण्यासाठी केलेले आयोजन आहे.
यातील सहभागी व्यक्तींमधून विजेत्या व्यक्तींना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे त्याच बरोबर ह्या स्पर्धे दरम्यान विशेष आकर्षण म्हणून सांघिक रास दांडिया गरबा नृत्य तसेच वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहे तरी मालवण वासीयांनी मोठ्या संख्येने ह्या भव्य गरब्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन मनसे कडून करण्यात आले आहे.
बंदर विभागाकडे परवानगी साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने चे तालुकाध्यक्ष संदिप लाड आणि सर्जेकोट शाखाध्यक्ष वैभव आंजगावकर ,सिद्धेश परब, गणेश गावडे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)