ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माजी खासदार निलेश राणे यांनी अज्ञान प्रकट करु नये : शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माजी खासदार निलेश राणे यांनी अज्ञान प्रकट करु नये : शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर.

प्रकाशन: 27 Sep 2022 02:48 PM
वाचन संख्या 257

मालवणातील आरसे महाल नूतनीकरण शंकेचा वाद.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या ‘आरसे महाल’ नूतनीकरण मुद्द्यावर शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांना सुनावले आहे.

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या म्हणण्यानुसार व त्यांनी प्रसार माध्यमांना सादर केलेल्या पत्रानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातले शासकीय विश्रांतीगृह ‘आरसे महल’ नूतनीकरणाच्या कामाची मंजुरी व प्रशासकीय मान्यता महाविकास आघाडी सरकारच्याच्या काळात अर्थसंकल्पीय तरतूद (अर्थसंकल्प) २०२० मध्ये करण्यात आली होती.

दोन दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी आरसे महल नूतनीकरण कामाची पाहणी करून स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर टिका केली होती.
वास्तवीक या मालवण ‘आरसे महाल’ विश्रांतीगृह कामाला मंजुरी व प्रशासकीय मान्यता ‘शासन निर्णय क्रमांक – बीडीजी-२०२०/प्र. क्र. ५१/इमारती – ३, सार्वजनिक बांधकाम विभाग, दि. २७ फेब्रुवारी, २०२०’ अन्वये देण्यात आली होती असे प्रतिपादन तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० च्या पत्रान्वये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील शासकीय विश्रामगृह इमारत दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया १८ जानेवारी २०२२ रोजी केल्यानंतर मे. प्रभू इंजिनियर्स, पिंगुळी यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. हे बजेट २०२० अंतर्गत मंजूर कामाला प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देण्याकरिता आमदार वैभव नाईक यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बजेट अंतर्गत मंजूर कामांपैकी पहिलेच काम प्रत्यक्षात सुरू देखील करण्यात आले आहे. या दरम्यानच्या काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकार च्या काळात च सर्व प्रकिया पूर्ण झाली आहे.
या कामाच्या मंजुरीसाठी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे शिफारस करून पाठपुरावा केल्यानंतर मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये तरतूद करून निधी मंजूर करून दिला होता. यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी उगीचच टिका करणे टाळून स्वतः चे अज्ञान प्रकट करू नये असे माजी जि. प.सदस्य व शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांना सुनावले आहे.
‘आरसे महाल’ नूतनीकरणाच्या श्रेयाचा हा विषय नसून आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केलेल्या कामाचीच आपण माहिती देत आहोत असेही माजी जि.प.सदस्य व मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स