सिंधुदुर्गात २२ पशुधन पर्यवेक्षक नियुक्त ; लंपी आजाराची पार्श्वभूमी लक्षात घेऊन निर्णय.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सध्या प्राण्यांना सतावत असलेल्या ‘लंपी’ आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून रिक्त असलेली पशुधन पर्यवेक्षकांची २२ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत.
आता जिल्ह्यात पशुधन पर्यवेक्षकाचे एकही पद रिक्त नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परीषदच्या नियंत्रणातील ७७, तर राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाचे २५ असे एकूण १०२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यापैकी २२ दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षक पदे रिक्त होती. जनावरांच्या लंपी साथरोग आजाराचा सामना करताना यामुळे अडचणी निर्माण होत होत्या.
या आजारासाठी मनुष्यबळ आवश्यक असल्याने ११ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने किंवा भरती होईपर्यंत यापैकी जे आधी होईल तेवढ्या कालावधीसाठी दर महिना १५ हजार रुपये मानधनावर ही पदे भरण्यात आली आहेत.
पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्याना याचा लाभ देण्यात आला आहे, असे डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)