आजपासून 'यतीन खोत मित्र मंडळ पुरस्कृत व सौ.शिल्पा यतीन खोत आयोजीत' नवरात्रोत्सव कार्यक्रमांचा शुभारंभ..!
शिवप्रेमी समाजसेविका सौ.शिल्पा यतीन खोत आयोजीत मानाचा नवरात्रोत्सव सोहळा..
लहान मुलांसाठी व महिलांसाठी आकर्षक सांस्कृतिक उपक्रम होणार साजरे; मान्यवरांची असणार उपस्थिती.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात आजपासून माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक ‘यतीन खोत मित्रमंडळ’ पुरस्कृत व शिवप्रेमी समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत आयोजीत नवरात्रोत्सवाचा शुभारंभ होत आहे.
आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रात्री ८ वाजता या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.
यंदा या सोहळ्यात पाचव्या दिवशी लहान मुलांसाठी ‘फॅन्सी ड्रेस स्पर्धा’ (पहिला गट : ३ वर्षे ते ५ वर्षे , दुसरा गट ६ वर्षे ते ८ वर्षे तर तिसरा गट ९ वर्षे ते ११ वर्षे.) आयोजीत करण्यात आली आहे.
महिलांसाठी खुल्या गटाची फॅन्सी ड्रेस स्पर्धा हे सुद्धा एक आकर्षण असणार आहे.
यंदा या सोहळ्यात नाविन्यपूर्ण विविध तथा पारंपारिक सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असणार आहे.
यंदा लहान मुलांसाठी विशेष आकर्षणाचे उपक्रम आखले गेले असून ही लहान मुलेच आपल्या शहराचे , तालुक्याचे ,जिल्ह्याचे व राज्याचे भविष्य असल्याने त्यांच्यात पारंपारिक संस्कृतीचा आनंदाने जागर करणे व महिलांना व्यक्ततेचा व हक्काचा सांस्कृतिक मंच देणे ही आपले एक सामाजिक बांधिलकी असल्याचे आयोजक सौ.शिल्पा यतीन खोत यांनी सांगितले आहे.
माजी बांधकाम सभापती व नगरसेवक श्री. यतीन खोत यांच्या निवासस्थाना जवळील मैदानावर होणार्या या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या नवरात्रोत्सवाला शहरातील सर्व नागरीकांनी दरवर्षीसारखीच जोशपूर्ण उत्साहाने उपस्थिती लावून देवीचा जल्लोषने जागर करायचे आवाहन शिवप्रेमी समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत व माजी बांधकाम सभापती व नगरसेवक श्री. यतीन खोत व यतीन खोत मित्रमंडळ यांनी केले आहे.
या संदर्भात कोणाला अधिक माहिती हवी असेल तर त्यांनी 94225 84641 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)