माजी आरोग्य सचिव चंद्रकांत घाडीगांवकर यांनी दिला त्रिंबकच्या एका आजारी महिलेला मदतीचा हात; देवीचा असाही ज़ागर.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पिडीत महिलेला मदत करत स्री शक्तीचा केला अनोखा सन्मान.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक घाडीवाडी येथील आजारी स्नेहल घाडीगांवकर यांना उपचारासाठी मदतीचा हात देत माजी आरोग्य सचिव मुंबई यांनी रोख दहा हजाराचा धनादेश सुपूर्द केला आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका पिडीत महिलेला आर्थिक मदतीचा हात देत घाडी यांनी देवीचा व स्त्री दाक्षिण्याचा एक वेगळाच सामाजिक आदर्श ज़ागर जागवला आहे.
पतीला झालेल्या अपघाताचा धक्का घेऊन स्नेहल या एप्रिल महिन्यात कोमात गेल्या होत्या.त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. परिस्थितीमुळे त्यांना उपचाराचा खर्च परवडत नव्हता
उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज,विभाग सिंधुदूर्ग कडून आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. तसेच क्षत्रिय घाडीगांवकर सेवा समाज मुंबई विभाग सिंधुदुर्ग कडून आपत्कालीन मदत देण्यात आली होती. उपचाराला प्रतिसाद देत त्यांची प्रकृती काही प्रमाणात सुधारत आहे. सध्या त्या घरी उपचार घेत आहेत.मात्र उपचारासाठी येणाऱ्या खर्चा मुळे त्यांना मदतीची गरज होती. ही बाब ओळखून आचरा येथील रहिवासी आणि मुंबई मंत्रालय सेवानिवृत्त आरोग्य विभाग सचिव चंद्रकांत घाडी यांनी तातडीने दहा हजाराचा चेक स्नेहल घाडीगांवकर यांना सुपूर्द करत आर्थिक मदतीचा हात दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत अर्जुन बापर्डेकर व इतर समाजशील व्यक्ती उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)