ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नरडवे येथील श्री अंबादेवी मंदिरात नवरात्र उत्सवाचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नरडवे येथील श्री अंबादेवी मंदिरात नवरात्र उत्सवाचे आयोजन.

प्रकाशन: 25 Sep 2022 08:38 PM
वाचन संख्या 29

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या नरडवे गावाचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात सोमवारी, २६ सप्टेंबरला घटस्थापना करण्यात येणार आहे .
मंगळवारी, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. दसर्याला सोने लुटून या नवरात्रौत्सवाचा समारोप होणार आहे.

मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भक्तांच्या हाकेला धावणा-या अंबाबाईचा महिमा अगाध आहे. गावात नांदणारी शांती तिच्याच कृपेने कायम असल्याचा विश्वास भक्तांमध्ये आहे. करवीरनिवासिनी श्री अंबादेवीचा अंश या देवीमध्ये असल्याची भावना भक्तांची आहे. घटस्थापनेनंतर दस-यापर्यंत बारा-पाच ग्रामस्थ परंपरेनुसार देवळात धार्मिक कार्य पार पाडत असतात. कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील भगवती, नरडवेची अंबादेवी आणि कुपवडे येथील होळवादेवी, वर्देची सातेरीदेवी अशा बहिणी आणि वर्दे येथील श्री रवळनाथ त्यांचा भाऊ असल्याचे मानले जाते.

अंबादेवी मंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन घटस्थापना केली जाते. गावरहाटीप्रमाणे देवीचे दागिने धुणे, देवीची पूजा, मूर्तीची सजावट, घटस्थापना, ढोल वाजविणे, किरणोत्सव ही कामे बारा-पाचांमधून नेमून दिल्याप्रमाणे केली जातात. यानंतर दररोज पूजा-अर्चा आणि भजने असा कार्यक्रम होतात. सर्व माहेरवासिनी येऊन देवीची ओटी भरतात.

आठव्या रात्री नवचंडी हवन होते. यावर्षी सोमवारी रात्री म्हणजे मंगळवारी ,४ ऑक्टोबरला पहाटे हे हवन होणार आहे. या धार्मिक विधिवेळी मोठ्याप्रमाणावर भक्तजन , ग्रामस्थ उपस्थित असतात. दस-याला मंदिराबाहेर असलेल्या आपटय़ाच्या झाडाच्या पानांची लयलूट केली जाते. नवरात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रम आणि दर्शनाचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स