ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, सिंधुदुर्ग विभागाने केले एक असेही 'कन्यापूजन..!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, सिंधुदुर्ग विभागाने केले एक असेही 'कन्यापूजन..!'

प्रकाशन: 25 Sep 2022 08:25 PM
वाचन संख्या 173

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने एक वेगळीच सामाजिक सेवा घडताना नकळत अनोखे कन्यापूजन देखील घडले आहे.
कणकवली तालुक्यातील वागदे केंद्रशाळेमधील दुसऱ्या इयत्तेत शिकणारी सात वर्षीय विद्यार्थिनी कु. स्वरा संतोष घाडीगांवकर हिला मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाला. तिच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, सिंधुदुर्ग विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन तिच्या प्रकृती विषयी चौकशी केली. तसेच सिंधुदुर्ग विभागाच्या आपत्कालीन निधीमधून स्वराच्या उपचारासाठी मदत देण्यात आली.
यावेळी घाडीगांवकर समाजाचे पदाधिकारी सर्वश्री विजय गावकर , सूर्यकांत घाडी , प्रदीप घाडी , विलास गांवकर ,लक्ष्मण घाडीगावकर , बुधाजी गावकर , उमेश घाडीगावकर , अशोक घाडीगांवकर , स्वराचे आईवडील संतोष घाडीगांवकर आणि संजना घाडीगांवकर , स्वराच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा सावंत आणि शिक्षिका वैष्णवी परब उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स