ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार नितेश राणेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन.

प्रकाशन: 25 Sep 2022 08:06 PM
वाचन संख्या 66

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्युतपुरवठ्या संदर्भात निवेदन.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्याला कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण येथील २२० / १३२ के. व्ही. तसेच सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील २२० / १३२ के.व्ही.च्या अति उच्चदाब केंद्रातून विद्युत पुरवठा होत आहे. दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी खारेपाटण येथील अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे मालवण, कुंभारमाठ, पेंडूर, आचरा, तळेबाजार, जामसंडे, देवगड, वाडा, वैभववाडी, खारेपाटण येथील ३३/११ के. व्ही. वरील वीज पुरवठा बाधित झाला होता. त्यामुळे सुमारे १,२०,००० ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या इन्सुली व खारेपाटण या दोन अति उच्चदाब केंद्रांपैकी एखाद्या केंद्रात भविष्यात अशा प्रकारचा बिघाड निर्माण झाल्यास दुसऱ्या केंद्रातून विद्युत पुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था निर्माण झाल्यास ग्राहकांची गैरसोय होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे २४ तास सुरळीत विद्युत पुरवठा सुरू असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपल्या स्तरावरून त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, त्याचप्रमाणे खारेपाटण येथील महापारेषणचे विज उपकेंद्र आगीमुळे नादुरूस्त झाल्याने त्याचे दुरूस्तीसाठी आवश्यक निधीची उपलब्धता त्वरीत करून देण्यात यावी असे निवेदन आम. नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स