ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
रोणापाल मध्ये रंगणार निमंत्रितांची भजन स्पर्धा..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

रोणापाल मध्ये रंगणार निमंत्रितांची भजन स्पर्धा..!

प्रकाशन: 25 Sep 2022 05:21 PM
वाचन संख्या 44

बांदा | राकेश परब :
रोणापाल येथील माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त २९ व ३० सप्टेंबरला निमंत्रितांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २६ सप्टेंबरला देवीची विधीवत पूजा व घटस्थापना, रात्री ८ वाजता किर्तन, मंगळवार २७ रोजी स्थानिकांची भजने, बुधवार २८ रोजी रात्री ८ वाजता सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब पुरस्कृत अष्टविनायक दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल.गुरुवार २९ रोजी दोन दिवसीय निमंत्रितांच्या भजन स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये व चषक, द्वितीय ५ हजार रुपये व चषक, तृतीय ४ हजार रुपये व चषक, उत्तेजनार्थ ३ हजार रुपये व चषक देण्यात येईल. तसेच उत्कृष्ट गायक, तबलावादक, हार्मोनियम वादक, पखवाजवादक, झांजवादक, कोरस व उत्कृष्ट श्रोता यांना प्रत्येकी ५०० रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
शनिवार १ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता चेंदवणकर गोरे दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग, रविवार २ रोजी चपई नृत्य, सोमवार ३ रोजी सत्संग, मंगळवार ४ रोजी होम मिनीस्टर, संगीत खुर्ची व दिपोत्सव कार्यक्रम होईल. बुधवार ५ रोजी दसरा, व पावणी कार्यक्रमाने सांगता होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स