ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर…!

प्रकाशन: 25 Sep 2022 05:13 PM
वाचन संख्या 46

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- नाशिक, संजय राठोड- यवतमाळ, वाशिम, सुरेश खाडे- सांगली, संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव) रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,अब्दुल सत्तार- हिंगोली, दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर, अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे, मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स