तांबुळी माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रम…!
बांदा | राकेश परब :
तांबुळी येथील माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २६ सप्टेंबरला सकाळी देवीची विधीवत पूजा व घटस्थापना, रात्री स्थानिकांचे भजन, मंगळवार २७ रोजी गाव मर्यादित डान्स व वेषभूषा कार्यक्रम, बुधवार २८ रोजी दुपारी ३ वाजता गाव मर्यादित रांगोळी स्पर्धा व सायंकाळी पाककला स्पर्धा व त्यानंतर भजन, गुरुवार २९ रोजी सायंकाळी ७ वाजता संगीत कार्यक्रम व त्यानंतर भजन होणार आहे.
शुक्रवार ३० रोजी सायंकाळी ७ वाजता गाव मर्यादित महिलांसाठी फुगड्यांचा कार्यक्रम होईल. शनिवार १ ऑक्टोबर रोजी भजन व गायन कार्यक्रम, रविवार २ रोजी रात्री ९ वाजता अमृतनाथ दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग, सोमवार ३ रोजी सायंकाळी ७ वाजता झारापचे संदेश सामंत यांचे गायन व रात्री ८.३० वाजता सिद्धी साळगावकर यांचे कीर्तन होईल. मंगळवार ४ रोजी भजने व बुधवार ५ रोजी दुपारी महाप्रसाद होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तांबुळी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)