सेवानिवृत्त प्राध्यापक विलास गोलतकर यांचे निधन…!
मसुरे | प्रतिनिधी :
हडी पाणखोल जुवा गावचे सुपुत्र आणि भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास दाजी गोलतकर (वय ७४) यांचे शुक्रवारी कोल्हापूर येथे रुग्णालयात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने निधन झाले.
श्री. विलास गोलतकर हे नोकरीच्या निमित्ताने मुंबई डोंबिवली येथे राहत होते तर मुंबई ठाणे येथील सायन्स कॉलेज मध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. विज्ञान विषयाचे गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले जायचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हडी जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये झाले होते. तर मालवणच्या टोपीवाला हायस्कुल मध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले होते. एमएससी पर्यंत शिक्षण झालेले गोलतकर हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई या शिक्षण संस्थेवर ते गेली सहा वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)