ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत अपक्ष नगरसेवक नीरज घाडी भाजपात प्रवेश.

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत अपक्ष नगरसेवक नीरज घाडी भाजपात प्रवेश.

प्रकाशन: 03 Aug 2021 03:47 PM
वाचन संख्या 89

कणकवली | उमेश परब :देवगड जामसंडे नगरपंचायतीचे अपक्ष नगरसेवक नीरज घाडी यांनी नुकताच केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘काही नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार’, असे वृत्त होते. नगरसेवक नीरज घाडी यांच्या नावाचीही चर्चा होती.मात्र नगरसेवक नीरज घाडी यांनी भाजप प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
नगरसेवक नीरज घाडी यांची त्यांच्या प्रभागात चांगली पकड असून भविष्यात भाजपला फायदा होणार आहे, नगरसेवक नीरज घाडी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात.
आमदार नितेश राणे केवळ बोलून न दाखवता जनसेवा करून दाखवतात देवगड शहरात जनतेला काय गरजेचे आहे, हे फक्त आमदार नितेश राणे यांनी ओळखले आहे.देवगड च्या पर्यटनाला आमदार नितेश राणे यांच्या मुळे चालना मिळाली आहे,आमदार नितेश राणे करून दाखवणारे नेतृत्व आहे त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण भाजप पक्षात प्रवेश केला असल्याचे नगरसेवक नीरज घाडी यांनी सांगितले आहे. यावेळी सिंधुदुर्ग भाजप चिटणीस आरिफ बगदादी, जिल्हा सदस्य संदीप साटम,शरद ठुकरुल,देवगड उपसभापती रविंद्र तिर्लोटकर,शैलेश लोके,उत्तम बिर्जे,आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स