कणकवली येथील क्रिकेटपटू सत्यम पिळणकर यांचे निधन.
कणकवली / उमेश परब : कणकवली शहरातील पिळणकरवाडी येथील रहिवासी सत्यम मोहन पिळणकर (४०) यांचे आज गोवा बांबुळी येथील हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.त्याच्या अकाली निधनामुळे शहरात शोककळा पसरली आहे.सत्यम हा उत्तम क्रिकेटपट्टू होता.जिल्ह्यात विविध ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये ते पटकीदेवी मित्रमंडळाच्या संघातून खेळत असत.तसेच मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. रंगकाम व रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करीत असत.त्यांच्या दुःखद निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई,मुलगा,भाऊ,भावजय,पुतण्या असा परिवार आहे.समीर पिळणकर यांचे ते बंधू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)