ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नदीपात्रालगत सापडला मृतदेह..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नदीपात्रालगत सापडला मृतदेह..!

प्रकाशन: 23 Sep 2022 04:33 PM
वाचन संख्या 111

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण- चिंचवली मार्गावरील शुकनदीच्या पात्रालगत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. यामुळे एकच खारेपाटण परिसरात खळबळ उडाली आहे.
खारेपाटण येथे आज सकाळी १० वा. सुमरास खारेपाटण – चिंचवली रोड नजीक असलेल्या हसोळटेम्बच्या जवळ शुक नदीच्या पात्राशेजारील झाडात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदित मासेमारी करणाऱ्या व्यक्तींना आढळून आला. याबाबतची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी दिली. तसेच तातडीने पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांना घटनेची माहिती दिल्यानंतर खारेपाटण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पराग मोहिते, यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. मात्र सदर मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी देखील तात्काळ खारेपाटण ला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेबाबतचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स