ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीतील देवेंद्र राणेंचे निधन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीतील देवेंद्र राणेंचे निधन.

प्रकाशन: 23 Sep 2022 02:26 PM
वाचन संख्या 78

नुकतेच मुंबईतून उपचार करुन कणकवलीला आले होते कै. देवेंद्र राणे.

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत एक अत्यंत दुःखद घटना घडल्याने परिसरात शोकाचे वातावरण आहे.
पायाला झालेल्या जखमेवर मुंबईतील केईएम रुग्णालयातून उपचार घेऊन गावी आल्यानंतर खूपच अशक्तपणा जाणवू लागल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या देवेंद्र अभिमन्यू राणे (४५, रा. कणकवली- शिवाजीनगर) यांचे काल गुरुवारी निधन झाले.
दिवंगत देवेंद्र यांच्या डाव्या पायाला जुनी जखम होती. ही जखम चिघळल्यानंतर त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास देवेंद्र हे कणकवलीतील घरी आले. मात्र, त्यांना गाडीतून उतरताना खूपच त्रास होऊ लागला होता. अशक्तपणा असल्याने त्यांना १०.३० च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ११ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स