ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हा परिषदचे तीन कर्मचारी होणार राज्यातील मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हा परिषदचे तीन कर्मचारी होणार राज्यातील मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक..!

प्रकाशन: 23 Sep 2022 02:23 PM
वाचन संख्या 66

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे तीन कर्मचारी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून लवकरच रुजू होणार आहेत. त्यांच्या नियुक्तीचे आदेश जि. प. प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.

नव्या राज्य मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील तीन कर्मचाऱ्यांची स्वयं सहाय्यक म्हणून निवड केली आहे. जि. प. अध्यक्षांकडे स्टेनो म्हणून कार्यरत असलेल्या शिल्पा तांडेल यांची राज्याचे ग्राम विकास मंत्री व क्रीडा मंत्री गिरिश महाजन यांच्याकडे स्वीय सहायक म्हणून, तर जि. प. कृषी विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले अमित तेंडुलकर यांची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत.

वेंगुर्ले पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ सहाय्यक सुरज देसाई यांनी यापूर्वी सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे स्वीय सहायक म्हणून काम करत होते.

जि. प. च्या सामान्य प्रशासन विभागामध्ये नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले असून लवकरच ते नव्या नियुक्तीवर रुजू होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून एकाचवेळी तीन कर्मचाऱ्यांना मंत्र्यांचे स्वीय सहायक म्हणून पहिल्यांदाच नियुक्ती मिळाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स