ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सवतलतींसाठीची ३,५५६ स्मार्टकार्डस् एसटीच्या आगारांमध्ये पडून…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सवतलतींसाठीची ३,५५६ स्मार्टकार्डस् एसटीच्या आगारांमध्ये पडून…!

प्रकाशन: 23 Sep 2022 02:18 PM
वाचन संख्या 47

कणकवली | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये सवलतींच्या दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ. नागरिक, दिव्यांग व इतर सवलतींसाठी प्रवाशांकडे स्मार्टकार्ड असणे अनिवार्य आहे. एसटीच्या सवलतींचा लाभ मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४३,२७२ जणांनी स्मार्ट कार्डसाठी नावनोंदणी केली. स्मार्टकार्ड योजनेसाठी ४०,३८८ जण पात्र ठरले. त्यापैकी ३६,८३२ जणांनी आपली स्मार्टकार्डस् घेतली असून ३,५५६ जणांनी अद्यापही स्मार्टकार्डस् न घेतल्यामुळे ती एसटीच्या आगारांमध्ये पडून आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांना भाड्यामध्ये सुट दिली जाते. यासाठी आगोदर जुने ओळखपत्र ग्राह्य धरले जात होते. जुन्या ओळखपत्रावर अनेकवेळा गैरप्रकार होण्याची शक्यता होती. याला आळा घालण्यासाठी महामंडळ प्रशासनाकडून प्रवाशांना स्मार्टकार्ड योजना कार्यन्वित केली. मात्र, कोरोना संसर्ग, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या योजनेस ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रावाशांनी स्मार्टकार्ड घेऊन जावे, असे आवाहन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स