ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चाफेड गावठणवासिय मोबाईल नेटवर्क पासून वंचित.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चाफेड गावठणवासिय मोबाईल नेटवर्क पासून वंचित.

प्रकाशन: 23 Sep 2022 02:14 PM
वाचन संख्या 67

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील चाफेड गाव हा ग्रामीण भागात एकदम टोकाला आणि कणकवली तालुक्याच्या सीमेला लागून वसलेला आहे. या गावाची भौगोलिक परिस्थिती डोंगराळ असून गावठण भागात गेली कित्येक वर्षे मोबाईल धारक मोबाईलच्या नेटवर्क सेवेपासून वंचित आहे. या परिसरात कुठल्याही प्रकारचा मोबाईल टॉवर नसल्यामुळे विद्यार्थी वर्गाचा ऑनलाईन अभ्यास तसेच सुशिक्षित आय टी तरुण नोकरवर्गाला वर्क फ्रॉम होम करण्यास खूपच गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे या परिसरातील मुले ऑनलाईन सेवेच्या शोधात वणवण भटकावे लागते.

चाफेड गावाच्या बाजूला साळशी आणि कुवळे गावात मोबाईल टॉवर आहे. मात्र त्याची सुध्दा रेंज चाफेड गावठण परिसरात उपलब्ध नाही. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. भारत सरकारने “मेक इन इंडिया”, ” डिजिटल इंडिया” सुरू केली मात्र आजही खेडोपाडी ग्रामीण भागात आजूनही मोबाईल टॉवर (नेटवर्क) उभारले गेले नसल्यामुळे विद्यार्थी वर्ग, नोकरवर्ग, शेतकरीवर्ग यांना त्याचा ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येत नाही. शेतकरीवर्गासाठी शासनाने आजपर्यंत विविध योजना राबविल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात नेटवर्क सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या योजनांचा लाभ घेता येत नाही.अजूनही पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी शेतकरी वंचित राहिले आहेत.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात बहुतांशी विद्यार्थी वर्ग शैक्षणिक ऑनलाईन अभ्यासक्रमापासून वंचित राहिले होते. कुणी आजारी पडल्यास अत्यावश्यक सेवेच्या वेळी लोकांना वैद्यकीय सेवेसाठी अक्षरशः धावपळ करावी लागते. मुंबईहून काही कामानिमित्त आलेले चाकरमानी, नोकरवर्ग आपली नोकरी संदर्भात ऑनलाईन कामासाठी इतर गावच्या ठिकाणी स्थलांतर व्हावे लागते.

याबाबत चाफेड ग्रामपंचायतीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करूनही अद्याप कुठल्याही कंपनीचा मोबाईल टॉवर मंजूर झालेला नाही. याबाबत ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे यांनी आग्रही मागणी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स