ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावंतवाडी पालिका घेणार इलेक्ट्रिक कचरा गाड्या..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंतवाडी पालिका घेणार इलेक्ट्रिक कचरा गाड्या..!

प्रकाशन: 23 Sep 2022 12:41 PM
वाचन संख्या 34

सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेने आमदार निधीतून इलेक्ट्रिक कचरा गाडी खरेदी करण्यासाठी पाठविलेल्या अर्जाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सहा गाड्या खरेदी करण्यासाठी १८.६० लाख रुपये निधी मिळणार असल्याची माहिती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर यांनी दिली. सावंतवाडी शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने पावले उचलली आहेत. त्यासाठी पालिका सहा इलेक्ट्रिक कचरा गाड्या खरेदी करणार आहे. सध्या प्रदूषणामुळे तापमान वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर दिला आहे. डिझेल, पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर शासन स्तरावर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रत्येक विभागात इलेक्टिक गाड्या दिसणार आहेत. सावंतवाडी पालिका ही आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणार आहे. त्याचाच भाग म्हणून गाड्या खरेदी करणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स