प्रमोद नारायण तळेकर यांना मातृशोक.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कणकवली तालुक्यातील दारुम येथील सरस्वती नारायण तळेकर, वय वर्षे ९३ यांचे बुधवारी पहाटे २ वाजता वृद्धापकालाने निधन झाले. त्यांच्यावर दारूम येथील स्मशान भूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ५ मुलगे, ३ मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गवाणे पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिरचे संचालक तथा तळेरे पंचक्रोशी विकास सोसायटीचे विद्यमान संचालक प्रमोद तळेकर तसेच मुंबई मंडळ दारूमचे अध्यक्ष मनोहर तळेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)