ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
देवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊ चव्हाण यांचे निधन…!

देवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊ चव्हाण यांचे निधन…!

प्रकाशन: 23 Sep 2022 10:36 AM
वाचन संख्या 47

मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील देवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य कृष्णा ऊर्फ भाऊ माधवराव चव्हाण (वय-६६) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने देवली गावावर शोककळा पसरली आहे.

भाऊ चव्हाण हे देवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच म्हणून काम पाहत होते. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना समितीवर सदस्य म्हणून कार्यरत होते. गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रमात त्यांचे मोठे योगदान होते. ते गेले काही दिवस आजारी होते. यात आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने देवली गावावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ शिक्षक नेते भाई चव्हाण यांचे ते भाऊ होत. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स