ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सौ. श्रद्धा कदम सिंधुदुर्गात अव्वल..!

सौ. श्रद्धा कदम सिंधुदुर्गात अव्वल..!

प्रकाशन: 23 Sep 2022 06:43 AM
वाचन संख्या 227

विमा क्षेत्रात सलग पाच वर्षे आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील विमा प्रतिनिधी सौ.श्रद्धा कदम यांचा कोल्हापूर विभागाचे सीनियर डिव्हिजन मॅनेजर श्री.अभय कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार झाला.
सलग पाच वर्षे विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार (MDRT) प्राप्त करणाऱ्या सौ.श्रद्धा कदम
यांच्या कणकवलीतील कार्यालयात हा सत्कार करण्यात आला .
यावेळी कणकवली शाखाधिकारी सतेजा बोवलेकर,विकास अधिकारी श्री. श्रीनिवास पळसुले आदी उपस्थित होते.
सौ. कदम गेली २५ वर्षे विमा क्षेत्रात आहेत. सेवाभावी वृत्तीच्या जोरावर त्यांनी सामान्य जनतेपासून उच्चस्तरीय जनतेपर्यंत विमा क्षेत्रात आपली विश्वासहर्ता निर्माण केली. सलग पाच वर्षे विमा क्षेत्रातील हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळून सिंधुदुर्गात विमा क्षेत्रात प्रथम स्थान पटकाविले आहे.
गेली पाच वर्ष त्या डिव्हिजन मध्ये पहिल्या पाच क्रमांकात असून शाखेत पहिल्या क्रमांकावर आहेत.
कणकवली येथे त्यांचे स्वतंत्र विमा सेवा कार्यालय असून ग्राहकांना सेवा आणि अभ्यासपूर्ण माहिती देत असल्याने त्यांनी आपल्या व्यवसायात विश्वासार्हता निर्माण केली.
कोरोना काळातही त्यांनी ग्राहकांना वेळोवेळी विमा कामाबाबत मदत केली.सलग पाच वर्ष विमा क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त केल्याने विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांचे डेव्हलपमेंट ऑफिसर श्री. श्रीनिवास पळसुले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स