ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिरगांव मध्ये आज दुचाकीने घेतला अचानक पेट..!

शिरगांव मध्ये आज दुचाकीने घेतला अचानक पेट..!

प्रकाशन: 22 Sep 2022 09:44 PM
वाचन संख्या 299

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या चाफेड भोगलेवाडी येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुनील गोपाळ कांडर यांच्या मालकीच्या बजाज पल्सर ही दुचाकी गाडी सुरू करत असताना अचानक पेट घेतला. यात दुचाकीचे सुमारे ३० ते ४० हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना आज गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास साळशी रोड जवळ घडली.

सुनील कांडर हे काही कामानिमित्त आपली मालकीची (एम.एच ०७ एन ६०६२) ही बजाज पल्सर १३५ मोटरसायकल घेऊन शिरगाव ला गेले होते. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ते घरी जात असताना त्यांच्या गाडीने सुरू करतेवेळी अचानक पेट घेतला. त्यावेळी त्यांनी तशीच गाडी सोडून आपला जीव वाचविला. आणि हा हा म्हणता संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी आली. बाजारपेठेतील काहिंनी ही आग विझविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र या आगीने खूप मोठे रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गाडी जाळून खाक झाली. यात त्यांचे सुमारे ३० ते ४० हजाराचे अपरिमित असे नुकसान झाले आहे. सुनील गोपाळ कांडर यांची घरची आर्थिक परिस्थीती खूप बिकट आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स