ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सावंतवाडी पोलिसांकडून चोरटा दगडी कोळसा जप्त ; संशयीताला अटक व जामिनावर सुटका.

सावंतवाडी पोलिसांकडून चोरटा दगडी कोळसा जप्त ; संशयीताला अटक व जामिनावर सुटका.

प्रकाशन: 22 Sep 2022 09:17 PM
वाचन संख्या 120

८ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त..!

शेर्लेेत असलेल्या साठ्याची होणार सखोल चौकशी.

सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरट्या दगडी कोळशाची वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन १ लाख ८० हजाराच्या दगडी कोळशासह साडे सहा लाखाचा कंटेनर मिळून ८ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यामुळे शेर्ले येथे साठा करुन ठेवण्यात आलेला कोळसा नेमका कोणाचा ? यामागे कोण ? याबाबत आता पोलिस चौकशी करणार आहेत. ही कारवाई काल रात्री अकरा वाजता येथिल पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात आली. गजानन भारत नळेकर (१९) रा. वेंगुर्ले, असे त्याचे नाव आहे. तर कंटेनर बांदा येथील व्यक्तीचा आहे. गोवा महाराष्ट्राच्या सिमेवर चोरटा दगडी कोळसा ठेवल्याची गेले काही दिवस चर्चा होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी सोळंके यांनी दिलेल्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी संबधित संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
गोवा महाराष्ट्राच्या सिमेवर शेर्ले येथे मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा आणून ठेवला गेला आहे. आरोसबाग येथून नदीच्या मार्गाने चोरटा कोळसा आणला जातो. शेर्ले येथिल एका भागात याचा साठा करुन ठेवला आहे, अशी चर्चा होती. याबाबतच उपविभागीय पोलिस अधिकारी सोंळके यांनी पोलिस सहकारी व कर्मचार्‍यांना तय्यार राहण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार काल रात्री पोलिस रस्त्यावर गस्त घालत असताना समोरून एक कंटेनर संशयास्पदरीत्या येताना दिसला. यावेळी त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्याच्या गाडीत दगडी कोळसा आढळून आला. मात्र अधिक माहीती विचारली असता त्याने असंबंध उत्तरे दिली. त्यामुळे याप्रकरणी कलम ‘४१ अ’ प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली व येथिल न्यायालययात हजर करण्यात आले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. याबाबत पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अशा प्रकारची पहीलीच जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. दगडी कोळश्याचा याठीकाणी उत्पन्न अथवा वाहतूक होत नाही. मात्र तो नेमका कोठून आणला ? कोठे नेला ? जात होता. याबाबत माहिती विचारली असता संबधिताने असंबंध उत्तरे दिली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस प्रसाद कदम व वाहतूक पोलीस रामचंद्र साटेलकर यांच्या माध्यमातून करण्यात आली.
आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स